महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे 176व्या महिलेची जटेतुन मुक्तता

0 झुंजार झेप न्युज

महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती पुणे जिल्ह्यातर्फे 176व्या महिलेची जटेतुन मुक्तता.... 

माळशिरस (जि.सोलापुर)येथे राहात असलेल्या श्रीमती सुभद्रा गेंड (वय 50वर्षे)यांच्या डोक्यात गेली 5वर्षापासुन जट झाली होती.साधारण दोन किलो वजनाच्या जटेमुळे शारीरिक व मानसिक त्रास होत होता.जट काढुन टाकायची होती पण समाजातील इतर लोक मनात भीती निर्माण करायचे,ती जट कापण्यासही कोणी तयार होत नव्हते.सुभद्रा ताईचा मुलगा शिवाजी गेंड यांनी दोन ब्युटीपार्लर मध्यै जावुन चौकशी केली असता ती जट देवाची आहे म्हणुन आम्ही कापत नाही असे सांगितले.तेव्हा त्यांनी गुगलवर जट निर्मुलन विषयी माहीती घेतली असता त्यांना माझा नं.मिळाला.लगेच मला फोन करून जटेबाबत माहीती करून घेतली.जट काढण्यास नातलगाचा विरोध होता.नातलगाच्या विरोधापेक्षा जटेमुळे आईला होणारा त्रास लक्षात घेवुन निर्णय घेण्यास सांगितले असता.त्यांनी आईला जट काढण्यासाठी दोन दिवसात पुण्याला घेवुन येतो म्हणुन सांगितले.

   आज रोजी साधना मिडीया सेंटरला सुभद्रा गेंड यांच्या डोक्यातील जट काढुन त्यांची जटेसारख्या अंधश्रध्देतुन मुक्तता करण्यात आली.

  या प्रसंगी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे सचिव मिलिंद देशमुख,पुणे शहर शाखेचे अध्यक्ष श्रीपाल ललवाणी,राष्ट्रसेवा दलाचे राज्य कार्याध्यक्ष गोपाळ नेवे तसेच शिवाजी गेंड या सर्वाच्या उपस्थितीत नंदिनी जाधव  यांनी जट निर्मूलन केले.

 नंदिनी जाधव महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती

                                      पुणे जिल्हा,कार्याध्यक्ष

                                           9422305929

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.