50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

0 झुंजार झेप न्युज

 

50 हून अधिक घरफोडी करणारे सर्राइत चोरटे जेरबंद, पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे शहर आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सर्राइत चोरट्यांसह एका अल्पवयीनला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे.


पुणे : पुणे शहर आणि परिसरात 50 हून अधिक घरफोड्या करणाऱ्या दोन सर्राइत चोरट्यांसह (Pune Thief Arrested) एका अल्पवयीनला हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने, चांदीच्या विटा आणि पाच चारचाकी गाड्यांसह जवळपास 30 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

सनीसिंग पापासिंग दुधानी (वय 19), सोहेल जावेद शेख (वय 19) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. तर एका अल्पवयीन चोरट्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पुणे शहरात घरफोडीच्या मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या चोरट्यांना पकडण्याची मोहीम हाती घेतली. याच दरम्यान दरोडेखोरांची माहिती काढत असताना पोलिसांना या चोरट्यांची गुप्त माहिती मिळाली.

अटक केलेले चोरटे हे सर्राइत गुन्हेगार असून ते हडपसर परिसरातील म्हाडा कॉलनी येथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, पोलिसांनी सापळा रचून या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या अधिक चौकशीत त्यांनी पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 50 हून अधिक घरफोड्या केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी त्यांच्याकडून तब्बल 29 लाख 55 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. यातील बारा घरफोड्या उघड झाल्या असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.