शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती, विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

0 झुंजार झेप न्युज

 

शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती, विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचे 105 खासदार निवडून दिले. पण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती आहे असल्याची घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.


नागपूर : महाराष्ट्रावर (Maharashtra) सगळ्यात मोठं संकट असताना केंद्र सरकार (central government) राज्यासोबत दुजभाव करत असल्याची टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी केली आहे. भाजपला महाराष्ट्रातील लोकांनी मत दिली नाही का? मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पक्षाचे (bjp) आमदार राज्यात निवडून आले. महाराष्ट्रातील जनतेनं त्यांचे 105 खासदार निवडून दिले. पण शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी भाजपची नीती आहे असल्याची घणाघाती टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

यावेळी बोलताना वडेट्टीवारांनी महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं असल्याचा विश्वास दिला आहे. विदर्भातील चार जिल्ह्यांना सरकारनं मदत केली. केंद्राला मदतीसाठी3 पत्रं लिहिली, पाहणी पथकं पाठवण्यासाठी मागण करण्यात आली. पण तरीदेखील केंद्राकडे प्रस्ताव आलाच नाही असं भाजपचं म्हणणं आहे. त्यामुळे आम्ही आता आणखी एक पत्र पाठवणार असल्याचं विजय वडेट्टीवारांनी सांगितलं आहे.

भाजपवर टीका
यावेळी बोलताना विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. ‘भाजप लोकांमध्ये गैरसमज निर्माण करत आहे. शेतकऱ्यांची मत मिळाली म्हणून तुम्ही केंद्रात आहात. मात्र, त्यांनाच मदत दिली जात नाही. भाजप नेते चुकीचं विधान करतात आणि राज्याला मदत करायची नाही ही त्यांची भूमिका आहे. त्यामुळे कोणत्या तोंडाने भाजप गळा काढत आहे.’ असं टीका विजय वडेट्टीवारांनी केली आहे.

डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार
महाविकास आघाडी सरकार हे शेतकऱ्यांच्या मागे ठाम उभं असून 2297 कोटींची मदत आम्ही दिवाळीच्या आधीच दिली आहे. शेतकाऱ्यांसोबत उभं राहण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. 100 टक्के कापूस खरेदी आम्ही केली. पुढच्या आठवड्यात शेतकरी मदतीचा दुसरा टप्पा दिला जाणार आहे. 10 डिसेंबरपर्यंत पूर्ण निधी शेतकऱ्यानंपर्यंत पोहचेल अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली आहे. तर किसान सन्मान योजनेत 600 कोटींची मदत केंद्र सरकार करते. पण तीदेखील अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नाही. यामुळे केंद्र सरकार शेतकऱ्यांचं घोर अपमान करत आहे असंही वडेट्टीवार म्हणाले.

’50 टक्के लोकांनी बिल भरली’
दरम्यान, वीज बिल माफ करण्याच्या मागणीवर लोकांच्या भावना तीव्र आहेत. आम्हाला लोक भेटतात निवेदन देत आहेत. पण ऊर्जा विभागाने जो निर्णय घेतला त्यावर मंत्री मंडळात चर्चा होईल. चुकीचं काही झालं असेल तर त्यावर चर्चा करून निर्णय घेता येईल अशी माहिती विजय वडेट्टीवारांनी दिली आहे. 50 टक्के लोकांनी बिल भरली आहे, 50 टक्के लोकांचा प्रश्न आहे. यामध्ये जर अन्याय झाला असेल तर चर्चा होणं आवश्यक असल्याचंही ते म्हणाले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.