स्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी

0 झुंजार झेप न्युज

 

प्लॅस्टिकप्रमाणे आवाजी फटाक्यांवर कायमची बंदी आणा, सत्यजीत तांबेंची आदित्य ठाकरेंकडे मागणी


मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर कायमस्वरुपी बंदी घाला, अशी सत्यजित तांबेंची मागणी आहे.

मुंबई : प्लॅस्टिकप्रमाणे मोठ्या आवाजाच्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर  कायमस्वरुपी बंदी आणावी, अशी मागणी महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे  यांच्याकडे केली आहे. 

“पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना विनंती आहे, कृपया मोठे आवाज करणाऱ्या आणि धूर करणाऱ्या फटाक्यांवर, प्लॅस्टिकवर ज्या पद्धतीने बंदी घातली, त्याप्रमाणे कायमस्वरुपी बंदी घाला. पुढच्या येणाऱ्या सात पिढ्या आपल्याला आशीर्वाद देतील” असे ट्विट सत्यजित तांबे यांनी केले आहे.

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून यंदाच्या दिवाळीसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. गृह विभागाने परिपत्रक जारी करुन नागरिकांना दिवाळी साध्या पद्धतीने साजरी करण्याचं आवाहन केलं आहे.

फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे, त्याऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

गृह विभागाच्या मार्गदर्शक सूचना :

1. दिवाळी सण कोरोना काळात साजऱ्या केलेल्या अन्य सणांप्रमाणेच पूर्ण खबरदारी घेऊन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करावा.

2. दिवाळी उत्सव घरगुती स्वरुपात मर्यादित राहील याची दक्षता घेण्यात यावी.

3. उत्सव कालावधीत ज्येष्ठ नागरिक आणि लहान बालकांनी घराबाहेर पडणं शक्यतो टाळावे. तसेच नागरिकांनी गर्दी टाळावी. मोठ्या प्रमाणात एकत्रित येऊ नये. मास्कचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे.

4. फटाक्यांची आतषबाजी करु नये. फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे कोरोनाचं संक्रमण वाढण्याची भीती आहे. त्यामुळे नागरिकांनी फटाके फोडणे टाळावे. त्याऐवजी दिव्यांचा आरास मोठ्या प्रमाणात करुन उत्सव साजरा करावा.



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.