चिंचवडमध्ये बेशिस्त चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर चढविली कार

0 झुंजार झेप न्युज

 

चिंचवडमध्ये बेशिस्त चालकाने वाहतूक पोलिसाच्या अंगावर चढविली कार…

पिंपरी (दि. ०५ नोव्हेंबर २०२०) :- चिंचवडमधील कामिनी हॉटेल जवळील अहिंसा चौकात वाहनांची तपासणी सुरु होती. त्यावेळी महावीर चौकाकडून क्रांतीवीर चाफेकर चौकाकडे मोटारीतून हनवते आणि त्यांच्यासमवेत एक इसम चालला होता. त्या दोघांनीही मास्क घातलेला नव्हता. पोलीस कर्मचारी सावंत यांनी त्यांना थांबण्याचा इशारा केला. मात्र, मोटारकार न थांबविता पोलिसाच्या अंगावर घातली. वाहतूक पोलीस कर्मचारी कसेबसे बोनेटवर चढले. मात्र, मोटार चालकाने गाडी न थांबविता तशीच दामटली.

पोलीस कर्मचारी सावंत यांना बोनेटवर घेतल्यानंतर आजुबाजुच्या नागरिकांनी आरडाओरडा करीत गाडी थांबवण्याचा इशारा केला. काही युवकांनी दुचाकीवर पाठलाग करीत वाहनचालकाला गाडी थांबवण्यास सांगितले. त्यानंतरही हनवते गाडी दामटत राहिले. अखेरीस नागरिकांच्या गर्दीमुळे एल्प्रो चौकाकडून सुरु झालेला हा थरार वाल्हेकरवाडी जुना जकात नाका येथील क्रांतीवीर चाफेकर पुलाखाली थांबला.

जवळपास दहा मिनिटे सिनेस्टाईल पाठलाग केल्यानंतर मोटारकार थांबविण्यात यश आले. पोलीस कर्मचाऱ्याचा पाय विचित्र पद्धतीने मुडपल्याने गुडग्याच्या लिगामेंटला दुखापत झाली आहे. पाय सरळ करता येत नाही. घटना गुरुवारी (दि. ५) दुपारी चारच्या सुमारास चिंचवडमधील एल्प्रो चौकात घडली. युवराज हनवते (वय अंदाजे ५०, रा. पिंपळे निलख ) या मोटारचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.