शरदला लाभली 'लक्ष्मी'...

0 झुंजार झेप न्युज

 

शरदला लाभली 'लक्ष्मी'...

शरद केळकरचे पाच लाख फॉलोअर्स झाल्यामुळे त्याने तसा फोटो इन्स्टावर टाकून सर्वाचे आभार मानले आहेत.


मुंबई : लक्ष्मी.. चित्रपट आला तसा तो पडला. अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला सर्वच समीक्षकांनी झापलं. त्याचा घाव अक्षयच्या इतका वर्मी लागला की त्याला स्टेटमेंट द्यावं लागलं. लक्ष्मी हा चित्रपट समीक्षकांना आवडला नाही. पण माझा चित्रपट त्यांच्यासाठी नाहीच. मी तर सामान्य लोकांसाठी सिनेमे करतो असं त्याचं म्हणणं. खरंतर त्याच सामान्य लोकांनी चित्रपट लाथाडला. असो. आता पुन्हा लक्ष्मी या चित्रपटाचा विषय येण्याचं कारण असं की लोकांना हा सिनेमा जेवढा आवडलेला नाही तेवढं या चित्रपटातलं लक्ष्मी ही भूमिका साकारणाऱ्या शरद केळकरचं काम लोकांना भावलं आहे. त्याचा थेट फायदा शरदला झाला.


लक्ष्मी चित्रपटातल्या भूमिकेमुळे शरदला सर्वच स्तरातून शाबासकी मिळते आहे. त्याचा फायदा झाला तो त्याच्या इन्स्टाग्रामच्या फॉलोअर्सवर. त्याच्या फॉलोअर्सनी 5 लाखांचा टप्पा पार केला आहे. शरदनेही आपल्या सर्व रसिकांचे, चाहत्याचे आभार मानले आहे, या भूमिकेबद्दल शरद म्हणतो, लक्ष्मी चित्रपटातली माझी भूमिका खरंतर कॅमिओ होती. पण त्या भूमिकेला विविध शेड्स होत्या. ती साकारणं अवघड होतं. पण तितकंच समाधान देऊन जाणारं होतं. म्हणूनच हा चित्रपट बघून आलेल्या लोकांची चित्रपटाबद्दलची मतं काहीही असोत. पण माझ्या कामाबद्दल सर्वांचं एकमत होतं आहे. त्यांच्या या कौतुकाबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. शिवाय. या चित्रपटाचे दिग्दर्शक राघव लॉरेन्स आणि अक्षयकुमार सर्वांचाच मी आभारी आहे.





शरद केळकरला या भूमिकेचं फलित नक्की मिळेल यात शंका नाही. त्याची सुरूवातही झालेली आहे. शरदने यापूर्वी बाहुबलीमधल्या अमरेंद्र आणि महेंद्र या दोन्ही प्रभासच्या व्यक्तिरेखांना आवाज दिला होता. त्याचं डबिंग लोकांना खूपच आवडलं. त्यानंतर शरद प्रामुख्याने दिसला तो तान्हाजी द अनसंग वॉरिअर या चित्रपटात. या चित्रपटात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या प्रमोशनवेळीही एका पत्रकारने शिवाजी राजांचा एकेरी उल्लेख केल्यावर त्याने ती चूक तत्काळ सुधारत छत्रपती शिवाजी महाराज असा केला. तेव्हाही अनेकांनी शरदला फॉलो करायला सुरूवात केली होती. आता लक्ष्मीमुळे त्यात भरच पडलेली दिसते. शरदचे पाच लाख फॉलोअर्स झाल्यामुळे त्याने तसा फोटो इन्स्टावर टाकून सर्वाचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.