खळबळजनक! आष्टी तालुक्यात दहा वर्षीय मुलाला बिबट्या ने नाले उचलून

0 झुंजार झेप न्युज

खळबळजनक! आष्टी तालुक्यात दहा वर्षीय मुलाला बिबट्या ने नाले उचलून

आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण

आष्टी-तालुक्यात बिबट्याची दहशत दिवसेंदिवस वाढू लागली असून या परिसरातील नागरिकांवर बिबट्या सातत्याने हल्ले करू लागला आहे. दोन दिवसापूर्वी पंचायत समिती सदस्य पतीला ठार मारल्यानंतर काल शिरूर कासार तालुक्यातील एका महिलेवर बिबट्याने हल्ला केला होता. शुक्रवारी या बिबट्याने एका दहा वर्षीय मुलाला उचलून नेल्याचा प्रकार दुपारी १२ च्या सुमारास आष्टी तालुक्यातील किन्ही येथे घडला आहे. या प्रकारामुळे संपूर्ण आष्टी तालुक्यात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाचे पथक या बिबट्याच्या शोधासाठी निघाले आहे.

स्वराज सुनील भापकर (वय-१० रा.भापकरवाडी.ता.श्रीगोंदा) हा आपल्या आजीच्या गावाकडे किन्ही येथे दिवाळीच्या सुट्टी निमित्त आला होता. दुपारी 12 च्या सुमारास स्वराज आपल्या नातेवाईकांसोबत घराशेजारील रानामध्ये गेला. यावेळी त्याचे नातेवाईक तुरीला पाणी देत असताना या बिबट्याने स्वराजवर झडप घातली आणि त्याला तोंडात पकडून काही अंतरावर घेऊन जात ठार मारले.या प्रकारानंतर संपूर्ण गावात खळबळ उडाली. याची माहिती वनविभागाला देण्यात आली असून वनविभागाचे पथके बिबट्याच्या शोधात निघाले आहेत.दरम्यान या प्रकारामुळे आष्टी तालुक्यात मात्र खळबळ उडाली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.