कंगनाच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा BMCला झटका
अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका दिला आहे. महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे.
मुंबई : अभिनेत्री कंगना रनौतच्या कार्यालय तोडफोडप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मुंबई महापालिकेला झटका दिला आहे. महापालिकेद्वारे पाठवलेली नोटीसही हायकोर्टाकडून रद्द करण्यात आली आहे. तसेच कंगनाला कार्यालयाचा ताबा घेण्यास परवानगी देण्यात आली आहे.
कंगना म्हणाली, हा लोकशाहीचा विजय
कंगना रनौतनं मुंबई उच्च न्यायालयाच्या या निर्णयानंतर आनंद व्यक्त केला आहे. तिनं म्हटलं आहे की, जेव्हा एखादी व्यक्ती सरकार विरोधात उभी राहते आणि विजय मिळवते त्यावेळी तो विजय त्या व्यक्तिचा नसून लोकशाहीचा विजय असतो. आपल्या सर्वांचे आभार ज्यांनी मला हिंमत दिली. त्या लोकांचेही आभार जे माझ्या तुटलेल्या स्वप्नावर हसले. याचं एकमेव कारण आहे की, आपण एक खलनायकाची भूमिका करता, त्यामुळं मी एक हिरो असू शकते, असं कंगनानं म्हटलं आहे.

