श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

0 झुंजार झेप न्युज

 

श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला, दोन जवान शहीद

श्रीनगरजवळील एचएमटी भागात तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत.


जम्मू- काश्मीर : श्रीनगरजवळील एचएमटी भागात सुरक्षा दलाच्या ताफ्यावर तीन दहशतवाद्यांनी अचानक हल्ला झाला. या हल्ल्यात दोन जवान शहीद झाला असून तीन जवान जखमी झाले आहेत. जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून हल्लेखोरांना पकडण्यासाठी परिसराचा वेढा दिला आहे.

या हल्ल्याविषयी माहिती देताना पोलीस महानिरिक्षक म्हणाले, हल्लेखोर मारुती कारमध्ये आले होते. त्यांनी अचानक जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याची शक्यता आहे. शोधमोहिम सुरू असून संध्याकाळपर्यंत या विषयी अधिक माहिती मिळेल. या हल्ल्यात आपले दोन जवान शहीद झाले आहे.

जवानांवर दहशतवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये दोन जवान गंभीररित्या जखमी झाले, त्यानंतर त्यांचे निधन झाले. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा या हल्ल्यामागे हात असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण ही संघटना या भागात अॅक्टिव्ह आहे. हल्ल्यानंतर दहशतवादी फरार झाले आहे. या तीन दहशतवाद्यांपैकी दोन दहशतवादी पाकिस्तानी असून एक दहशतवादी स्थानिक असल्याचा अंदाज आहे.


नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.