बिबट्याला जवळच पाहून तो चढला वीज खांबावर!
केकत जळगाव परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण
पैठण तालुका प्रतिनिधी:-(किशोर धायकर) केकत जळगाव ता. पैठण परिसरात बिबट्याचे दर्शन झाले नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. गणेश आदिनाथ थोरे हे आज सकाळी 7 वाजता गावाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले असताना फक्त दहा ते पंधरा फूट अंतरावर बिबट्या बसलेला होता. पाईप चा आवाज झाल्यामुळे बिबट्या उठला. हे पाहून गणेश घाबरला आणि तो जवळच असलेल्या वीज प्रवाह सुरू असलेल्या खांबावर चढला. तेथूनच त्याने वायरमन ला फोन करून विज प्रवाह बंद केला आणि खांबावरच बसला. नंतर शेजारील शेतकरी धावून आले आणि गणेश खाली उतरला. महिनाभरापासून केकत जळगाव परिसरात बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. त्यात वीज रात्री येत असल्याने पाणी पाळी देण्यासाठी शेतकरी जिवावर उदार होऊन जाताना दिसत आहे. घटनास्थळी वन विभागाचे अधिकारी साबळे गायके त्यांन पाहणी केली व ग्रामस्थांना संवाद साधला.

