एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या; सुदैवाने मुलगा बचावला

0 झुंजार झेप न्युज

 एकाच कुटुंबातील तीन जणांची धारदार शस्त्राने हत्या; सुदैवाने मुलगा बचावला

पैठण : शनिवारी मध्यरात्री संपूर्ण कुटुंब संपविण्याच्या उद्देशाने मारेकऱ्यांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील तीन जणांचा धारदार शस्त्राने भोसकून खुन करण्यात आला.  घरातील सहा वर्षाचा मुलगा मारेकऱ्यांनी मृत झाला असे समजून सोडून दिल्याने सुदैवाने तो बचावला आहे. गंभीर जखमी झालेल्या मुलास उपचारासाठी रूग्णालयात हलविण्यात आले असून सदर घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. 

पैठण शहरालगत नाथमंदीरा पाठीमागील गोदावरी  काठावर असलेल्या जुने कावसन या गावात शनिवारी  मध्यरात्री  पती, पत्नी व मुलगी अशा तीन जणांची धारदार शस्त्राने भोसकून खुन करण्यात आला आहे.  राजू निवारे  (४०) आश्विनी राजु  निवारे (३५) व मुलगी (१०) अशी खुन झालेल्यांची  नावे आहेत. मारेकऱ्यांनी निवारे कुटुंबातील सहा वर्षाचा मुलगा सोहम निवारे याच्यावरही वार केला असून  गंभीर अवस्थेत त्यास उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. 

पोलीस उप अधिक्षक गोरख भामरे, पोलीस निरीक्षक किशोर पवार, फौजदार छोटुसिंग गिरासे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देवून पाहणी केली.  मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन करण्यासाठी  पैठण येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी घटनास्थळास भेट देऊन पाहणी केली आहे.

नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.