आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला

0 झुंजार झेप न्युज

 

आशिष शेलारांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवू नये, अनिल परब यांचा टोला

शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी शेलारांना टोला लगावला.

मुंबई : माजी शिक्षणमंत्री आणि आमदार आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री ठरवू नये अशी टीका आज परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता परब म्हणाले की, भाजपला सत्तेची स्वप्न पडत आहेत आणि त्याच स्वप्नात त्यांनी भाजपच्या महिला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरवावा. काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या "कर्तृत्ववान मराठा स्त्रिया" पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी मराठा महिला मुख्यमंत्री व्हावी असं मत व्यक्त केले होते. त्याच पार्श्वभूमीवर आज अनिल परब यांनी शेलारांना टोला लगावला.


राज्यपालनियुक्त जागांबाबत माहिती देताना अनिल परब म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना राज्यपालनियुक्त जागांबाबत 15 दिवसांत निर्णय घ्यावा अशी विनंती केली होती. परंतु याबाबत राज्यपालांनी अजून कोणताही निर्णय घेतला नसून याबाबत महाविकास आघाडीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील.


महिला मुख्यमंत्रीपदाबाबत आशिष शेलार नेमकं काय म्हणाले?

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कर्तृत्ववान मराठा स्त्री व्हावी, अशी अपेक्षा बाळगणारा समाजात मोठा वर्ग आहे. याला माझ्यासारख्या माणसाचे सुद्धा शंभर टक्के समर्थन असू शकते, असं वक्तव्य भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. शेलार यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या या विधानाचा रोख सुप्रिया सुळे यांच्याच दिशेने होता, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. हे वक्तव्य करून आशिष शेलार यांनी एका दगडात तीन पक्षी मारल्याची पण चर्चा होती. सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या विषयाने अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अस्वस्थता वाढवण्याची खेळी या निमित्ताने आशिष शेलार यांनी केली. इतकच नाही तर आपल्या पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या महत्त्वाकांक्षेलाही छेद दिलाय अशी चर्चा सुरू झालीय.


नवनविन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर करा

https://www.youtube.com/channel/UCY8vo9nxBRaFx0NfI0YgpjQ

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.