झाडाला लटकलेल्या 'त्या' तीन तरुणांच्या मृत्यूचं गुढ वाढलं; तिघांपैकी एकाचा काळ्या विद्येचा अभ्यास
स्थानिक पोलिसांनी या तिघांचेही मृतदेह ताब्यात घेऊन सकृतदर्शनी आत्महत्या असल्याची नोंद केली आहे. मात्र, या तिघांच्या कुटुंबीयांनी ही आत्महत्या नसून त्यांचे खून करून त्यांना कोणीतरी झाडावर लटकवलं आहे, असा आरोप केलेला आहे. नितीनला काळी जादू आणि तंत्र मंत्र विद्या अवगत होती. त्यामुळे पोलिसांनी या तिघांची आत्महत्या आहे की खून आहे का तंत्र मंत्र विद्येच्या नादाला लागून पैशांचा पाऊस, मोक्षप्राप्ती यासाठी त्यांचा कोणीतरी बळी दिलेला आहे का? या दृष्टिकोनातून तपास सुरू केला आहे. नितीनकडे असलेल्या मोबाईलमध्ये ज्या बाबांचा नंबर आहे त्यांच्याकडे पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे. यासंदर्भात पोलिसांची विविध पथकं तालुक्यात, जिल्ह्यात रवाना झाली असून याबद्दल अधिकृत माहिती देण्यासाठी पोलिसांनी नकार दिलेला आहे. संपूर्ण तपास झाल्यानंतरच या प्रकरणा विषयीची माहिती आपण देऊ असेही पोलिसांनी सांगितलेला आहे.

