नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी ; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

0 झुंजार झेप न्युज

 

नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी ; पोलीस ठाण्यात तक्रार दाखल


पुणे: पुणे पदवीधर मतदारसंघाच्याव महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील ठोंबरे यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. रुपाली पाटील यांना फोनवरून धमकी देण्यात आली आहे तर धमकी देणारी व्यक्ती साताऱ्यातील आहे. याप्रकरणी रुपाली पाटील यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आसल्याने सर्वच उमेदवार प्रचारात गुंतले आहेत. अशात परिस्थिती आज पाटील यांना अज्ञात इसमकडून धमकी दिली गेल्याने एकच खबळबळ उडली आहे. धमकीच्या पार्श्वभूमीवर रुपाली पाटील यांनी पोलीस सुरक्षा पुरवण्याची मागणी यांनी केली आहे.

पुण्यातील मनसेचे आक्रमक व्यक्तिमत्त्व अशी रुपाली पाटील यांची ओळख आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून त्यांचा जोरदार प्रचार सुरु आहे. प्रचाराची रणधुमाळी सुरू असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमेदवार रुपाली पाटील यांनी जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सातारा येथील लबाडे आडनाव असलेल्या व्यक्तीनं पाटील यांना धमकी दिली आहे. आरोपींनं फोन करून ‘तू जिथे असशील तिथे संपवू टाकू, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस,’ अशी धमकी दिली आहे. पोलिसांनी तक्रारीची तातडीनं दखल घेऊन धमकी देणाऱ्याला अटक करावी, अशी मागणी रुपाली पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे. पदवीधर निवडणुकीच्या निमित्ताने रविवारपासून रुपाली पाटील या सातारा दौऱ्यावर आहेत. अशावेळी धमकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस सुरक्षा पुरविण्याची मागणी पाटील यांनी केली आहे.

रुपाली पाटील यांची प्रतिक्रिया

‘अशा पोकळ धमकीला मी घाबरणारी नाही. विद्यार्थी, शिक्षकांच्या अधिकार आणि हक्कांसाठी लढत राहीन, अशी प्रतिक्रिया रुपाली पाटील यांनी धमकीनंतर व्यक्त केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.