पुढच्या 5 दिवसांत रेल्वे प्रवाशांसाठी Good News, तिकिटांबाबत मोठी घोषणा

0 झुंजार झेप न्युज

भारतीय रेल्वे नव्या सुविधेसह आयआरसीटीसी पुढच्या पिढीच्या ई-तिकीट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील.

 नवी दिल्ली : रेल्वे मंत्री पीयूष गोयल पुढच्या 5 दिवसांमध्ये सर्व प्रवाश्यांसाठी खास गिफ्ट देणार आहेत. रेल्वे सीईओ वी. के यादव यांनी यासंदर्भात महत्त्वाची माहिती दिली आहे. शनिवारी आयोजित एका पत्रकार परिषदेमध्ये प्रवाश्यांना रेल्वे तिकिट बुकिंग आणखी सोयीचं करण्यासाठी भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड ट्यूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) ई-तिकिटींग वेबसाईट नवी सुविधेसह अपडेट करणार आहेत. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून काही दिवसांमध्ये रेल्वे मंत्री स्वत: यासंबंधी माहिती देणार आहेत. 

भारतीय रेल्वे नव्या सुविधेसह आयआरसीटीसी पुढच्या पिढीच्या ई-तिकीट वेबसाइटवरही काम करत आहे. या खास सुविधेनंतर रेल्वे प्रवासी सहज आणि सोप्या पद्धतीने रेल्वेची तिकिटे बुक करू शकतील. याआधी शुक्रवारी रेल्वेमंत्र्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, नवीन डिजिटल इंडिया अंतर्गत आता जास्तीत जास्त लोक प्लॅटफॉर्मच्या काउंटरवर जाण्याऐवजी ऑनलाईन तिकिट बुकिंग करण्याला जास्त प्राधान्य देतील. म्हणूनच आIRCTC वेबसाइट आणखी सोयीची बनवण्यासाठी काम करत आहेत.

रेल्वेने नुकतेच बदलले तिकिट बुकिंग करण्याचे नियम

(1) भारतीय रेल्वेनं ई-तिकिट बुकिंग (e-Ticket booking) करण्याच्या नियमांमध्ये नुकतेच बदल केले आहेत. आता प्रवाश्यांना तिकिट बुकिंग करण्यासाठी त्यांचा नंबरही द्यावा लागणार आहे.

(2) ई-तिकिट बुकिंग करताना प्रवाश्यांना रजिस्टर कॉनटॅक्ट नंबर (IRCTC registered mobile number) देणं आवश्यक आहे. भले तुम्ही कोणासाठीही बुकिंग केरत असाल तरी फोन नंबर महत्त्वाचा आहे.

(3) रेल्वेच्या म्हणण्यानुसार, अनेक प्रवासी तिकिट बुकिंग करून प्रवास करतात पण अनेक वेळा बुकिंग दुसऱ्यांच्या अकाऊंटवरून केलेली असते. बरेच प्रवासी एजेंटच्या मदतीनेही तिकीट बुक (Railway ticket Agents) करतात. त्यामुळे प्रवाशाच्या फोन नंबरची PRS सिस्टमध्ये नोंद होत नाही.

(4) अशा परिस्थितीत प्रवाशांना ट्रेन रद्द (Train Cancel) झाल्यावर किंवा ट्रेनच्या वेळापत्रकात (Railway timetable) काही बदल झाल्याची माहिती मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे ही सेवा सुरू करत आहेत. रेल्वेनं आतापर्यंत एसएमएसद्वारे प्रवाशांना याबद्दल माहिती दिली आहे.

(5) रेल्वेच्या म्हणण्यानुसार, सर्व प्रवाशांनी तिकीट बुकिंगच्या वेळी आपला मोबाइल क्रमांक नोंदवावा असं आवाहन केलं आहे.

(6) यामुळे रेल्वेच्या वेळापत्रकात वेळोवेळी होणाऱ्या बदलांची माहिती तुम्हाला मिळेल.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.