अमेरिकी तज्ज्ञांचा दावा – जुलैपर्यंत कोरोना पूर्णपणे संपणार, पण….

0 झुंजार झेप न्युज

 लवकरच कोरोना संपूर्ण जगभरातून नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीदेखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

नवी दिल्ली : कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गाचा (coronavirus pandemic) धोका अद्यापही कायम आहे. पण लवकरच कोरोना संपूर्ण जगभरातून नष्ट होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. असं असलं तरीदेखील काळजी घेणं महत्त्वाचं आहे. खरंतर, कोरोनाची लस आली आहे. अनेक देशांमध्ये तर लसीकरणाला (vaccination) सुरुवातही झाली आहे. या सगळ्यात जगात कोरोना रूग्णांची संख्या 830 दशलक्षच्या पुढे गेली आहे. यामध्ये तब्बल 5 कोटी 88 लाखाहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. तर 18 लाख 10 हजारांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. पण, या सगळ्या जीवघेण्या प्रवासात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. अमेरिकन तज्ञांनी कोरोना लवकरच संपणार असल्याचा दावा केला आहे. 

सगळ्यात जास्त लसीकरणाची गरज

अमेरिकी तज्ज्ञ आणि डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख सदस्य डॉक्टर फौसी यांनी एका खास मुलाखीतमध्ये यासंबंधी माहिती दिली आहे. फॉसी यांच्या म्हणण्यानुसार, कोरोनाचा सर्वाधिक परिणाम हा अमेरिकेवर झाला आहे. म्हणून मोठ्या प्रमाणात लसीकरण अत्यंत महत्वाचं आहे. इतकंच नाही तर लसीकरणाद्वारेच कोरोना मुळापासून दूर केला जाऊ शकतो. त्यामुळे जुलै 2021 पर्यंत सगळं काही ठीक होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलं आहे.

फौसी पुढे म्हणाले की, अमेरिका आणि जगातील बरेच देश एप्रिल 2021 पर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरण सुरू करतील. तसा त्याचा परिणामही दिसून येईल. यामुळे एप्रिल ते जुलै हे महिने सगळ्याच देशांसाठी महत्त्वाचे असणार आहेत. कारण या दरम्यान, कोरोना पूर्णपणे नष्ट होऊ शकतो असा दावा फौसी यांनी केला आहे.

जुलैपर्यंत सगळं काही सुरळीत होणार

डॉक्टर फौसी यांनी दिलेल्या माहितीनुसार, जुलैपर्यंत कोरोना आटोक्यात येऊन सगळं काही सुरळीत होऊ शकतं. त्यामुळे जुलैमध्ये शाळा, थिएटर, स्पोर्ट्स क्लब्स आणि हॉटेल्स आधीसारखे सुरू होतील असा दावाही त्यांनी केली आहे. पण यासगळ्यासाठी कोरोनाच्या नियमांचं पालन करणं महत्त्वाचं आहे. लसीकरणामध्ये आणि आरोग्याची काळजी घेण्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा होता कामा नये. यासाठी प्रत्येकाने आवश्यक ती काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.