IRCTC ची वेबसाईट सुपरफास्ट, 1 मिनिटात 25 हजार तिकीट बुकिंग क्षमता, 12 नवे फीचर्स

0 झुंजार झेप न्युज

नव्या वर्षात आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेट होणार आहे. त्यामुळे या वेबसाईटवर तुम्हाला नवे फिचर्स अनुभवता येणार आहे .

मुंबई : 1 जानेवारी 2021 पासून तिकीट बुकिंग खूप सोपं होणार आहे. नव्या वर्षात आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेट होणार आहे. त्यामुळे या वेबसाईटवर तुम्हाला नवे फिचर्स अनुभवता येणार आहे. आयआरसीटीसीची वेबसाईट अपग्रेड झाल्यानंतर तिकीट बुकिंगची प्रक्रिया खूप सोप्पी होणार आहे. नव्या वर्षापासून तिकीट बुकिंगचा स्पीड वाढणार आहे. त्यामुळे प्रवासी आधीपेक्षा जास्त लवकर तिकीट बुक करु शकणार आहेत.

विशेष म्हणजे नव्या वर्षापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर खाद्य पदार्थ उपलब्ध करण्याची सुविधा असणार आहे. आजपासून ट्रेनची बुकिंग सुपरफास्ट होईल. प्रवाशांना ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी अडचण येणार नाही.

रेल्वेचे सीईओ वी. के. यादव यांनी याबाबत माहिती दिली आहे. “नव्या वेबसाईट अंतर्गत तिकीट बुकिंगची प्रक्रिया खूप सोप्पी होणार आहे. यासोबतच खाद्य पदार्थांपासून, टॅक्सी ते हॉटेलपर्यंतची बुकिंग तुम्ही आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर करु शकणार आहात”, अशी माहिती यादव यांनी दिली.

तात्काळ तिकिटच्या वेळी बऱ्याचदा साईट हँग होते. पण आता वेबसाईटचा स्पीड वाढणार आहे. याशिवाय वेबसाईट आता हँगही होणार नाही. विशेष म्हणजे आता एका मिनिटात 5 लाख प्रवासी लॉगिन करु शकणार आहेत.

नवे फिचर्स काय आहेत?

1) आता 25 हजार प्रतीमिनिट तिकीट बुक होऊ शकणार आहेत. याशिवाय एकाचवेळी पाच लाख लोक लॉगिन करु शकतात. याआधी 40 हजार लोक एकावेळी लॉगिन करु शकणार होते.

2) सर्व ट्रेन्सची बुकिंग सोप्पी होणार आहे.

3) शेवटच्या व्यवहाराचा तपशील मिळेल

4) रिफंड संबंधित माहिती मिळेल

5) प्रवास आणि स्टेशनबाबत चांगल्या सूचना मिळतील

6) वन स्टॉप ट्रेन सिलेक्शन फीचरमध्ये बदल होतील

7) सर्व ट्रेन संबंधित सविस्तर माहिती मिळेल

8) प्रवासी, हॉटेलबु किंग, फूड, खाद्य पदार्थांच्या बुकिंगची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध असेल

9) एकदा ट्रेनचं तिकीट बुक केल्यानंतर दुसऱ्यावेळी तिकीट बुक करण्यासाठी पुन्हा तीच प्रक्रिया करावी लागणार नाही. दुसऱ्यांदा थेट तिकीट बुकिंगचं ऑप्शन मिळेल. पुन्हा नाव वगैरे टाईप करण्याची आवश्यकता लागणार नाही.

10) ट्रेन तिकीट बुक करताना तुम्ही खाद्य पदार्थांची देखील बुकिंग करु शकणार आहात.

11) ट्रेन तिकीट बुकिंग केल्यानंतर बाजूला पेमेंटचा पर्याय राहील, जेणेकरुन तिकीट बुक करताना कोणतीही चूक होणार नाही.

12) विशेष म्हणजे नव्या वेबसाईटमध्ये सायबर सुरक्षाला प्राधान्य देण्यात आलं आहे. कोणत्याही सायबर फ्रॉडला बळी न पडता तुम्ही या वेबसाईटवर सहजपणे तिकीट बुक करु शकणार आहात.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.