पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोविड -19 विरूद्ध लसीकरण कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लोकांना भारतात तयार होणारी लस लवकरच मिळेल, असं दिसून येत आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना लस कधी येणार याची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. लोकांची ही प्रतीक्षा आता लवकरच संपू शकते. कोरोना व्हायरस लसीला लवकरच सरकारची मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) याकडे लक्ष वेधले आहे. नवीन वर्षात देशात कोरोनाची लस उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने सूचित केले की, कोविड 19 लसीला स्थानिक स्वरूपाची मंजुरी लवकरच मिळू शकते. एका वेबिनारमध्ये ड्रग कंट्रोलर जनरल डॉ. व्ही.जी. सोमानी म्हणाले, नवीन वर्ष आमच्या हातात काहीतरी घेऊन येईल. सोमानी यांचं हे वक्तव्य अशावेळी आलं आहे जेव्हा कोरोना लसीच्या तातडीच्या वापरासाठी तज्ज्ञ पॅनेलची उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली जाणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही कोविड -19 विरूद्ध लसीकरण कार्यक्रमाची तयारी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे लोकांना भारतात तयार होणारी लस लवकरच मिळेल, असं दिसून येत आहे.
भारताची तयारी जोरात सुरू
गुजरातमधील राजकोट येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एम्सची पायाभरणी करताना सांगितले की, 'वर्ष 2021 कोरोना उपचारांची आशा आणत आहे. लस संदर्भात भारतात प्रत्येक महत्त्वपूर्ण तयारी चालू आहे. भारतात, लस प्रत्येक आवश्यक श्रेणीपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात आहेत. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम राबवण्यासाठी भारताची तयारी जोरात सुरू आहे. जसे संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न केले गेले त्याचप्रमाणे भारत लसीकरणाने एकजुटीने पुढे जाईल.
ड्राय रनमध्ये लस देण्यासाठी प्रामुख्यानं तयार करण्यात आलेलं Co-win अॅप आणि त्याची फिजिबलीटी, फिल्ड प्लॅनिंग आणि इम्प्लिमेन्टेशन तपासलं जाईल. लसीकरणाच्या वेळची सर्व प्रक्रिया इथं केली जाईल. फक्त लस दिली जाणार नाही.

