एकनाथ खडसेंची तब्येत ठीक नसल्यामुळे खडसे सध्या मुंबईलाच आहेत.
जळगावः राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse) कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. एकनाथ खडसेंनी कोरोनाची चाचणी केली असता त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय. एकनाथ खडसेंची तब्येत ठीक नसल्यामुळे खडसे सध्या मुंबईलाच आहेत.
एकनाथ खडसे 30 तारखेला ईडी कार्यालयात हजर होणार होते, मात्र कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याचं पत्राद्वारे स्वतः खडसे यांनी दुजोरा दिला होता. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना कोरोनाची लक्षणे जाणवत असल्याची माहिती समोर आली होती. गेल्या दोन दिवसांपासून खडसे मुंबईतल्या निवासस्थानी आहेत. लक्षणे जाणवत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून त्यांनी घरीच थांबणं पसंत केलंय. खडसेंना दुसऱ्यांदा कोरोनाची लक्षणे जाणवत आहेत.
जळगावात असताना खडसेंना कोरोनाची सौम्य लक्षणे जाणवू लागली. लक्षणे जाणवताच त्यांनी मुंबईच्या दिशेने प्रस्थान केले. मुंबईतल्या निवासस्थानी सोमवारी आणि मंगळवारी खडसेंनी आराम केला. दोन दिवसांपासून खडसे कार्यकर्त्यांना भेटत नाहीत वा कुणाच्याही संपर्कात नाही. अशात खडसेंनी कोरोनाची चाचणी केलेली असून, त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय.
याअगोदर एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अगदी काही दिवसांत त्यांना कोरोनाचा धोका पोहोचला होता. 19 ऑक्टोबर रोजी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. पुढच्या काही दिवसांत त्यांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. दुसरीकडे अगदी काही दिवसांपूर्वी एकनाथ खडसे यांना सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने नोटीस बजावलेली आहे. ईडीकडे हजेरी लावण्यासाठी खडसेंनी वेळ मागून घेतली होती. ईडीकडे हजेरी लावण्यापूर्वी खडसेंना कोरोनाची लक्षणे जाणवत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसेंना ‘ईडी’कडून चौकशीची नोटीस
भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP leader) दाखल झालेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना सक्तवसुली संचलनालयाकडून (ED) चौकशीसाठी नोटीस पाठवण्यात आल्याचे समजतेय. विश्वसनीय सूत्रांनी टीव्ही 9 मराठीला यासंदर्भात माहिती दिली. त्यानुसार ‘ईडी’ने 30 तारखेला एकनाथ खडसे यांना चौकशीसाठी पाचारण केले. हा राष्ट्रवादी काँग्रेस आणि एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
नी ईडी लावली तर मी सीडी लावेन, एकनाथ खडसेंचा इशारा
एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करतेवेळीच आपल्यामागे ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता व्यक्त केली होती. मात्र, भाजपने ईडी लावली तर आपण सीडी लावू, असा इशारा एकनाथ खडसे यांनी दिला होता. मला एकदा जयंत पाटील यांनी विचारलं की तुम्ही राष्ट्रवादीत येणार का? तर मी त्यांना सांगितलं की तुम्ही घेतलं तर येईन. तर त्यावेळी जयंत पाटील म्हणाले, तुम्ही आलात तर ते तुमच्यामागे ईडी लावतील, असे आमचे गमतीत बोलणं सुरु होतं. पण आता सांगतो जर त्यांनी ईडी लावली, तर मी सीडी लावीन, असे खडसे यांनी म्हटले होते.

