परतीच्या वाटा बंद; बीसीसीआयनं नाकारली युवराजची मागणी

0 झुंजार झेप न्युज

बीसीसीआयनं आपल्या नियमावलीमध्ये कोणतेही बदल न करता युवराजची मागणी नाकारल्याचं कळत आहे. या नियमांअंतर्गत....

 मुंबई : जवळपास 20 वर्षे क्रिकेटचं मैदान गाजवल्यांतर 2019 मध्ये जून महिन्यात त्यानं क्रिकेटला अलविदा केलं. पण, निवृत्तीनंतरही तो विविध लीग सामन्यांमध्ये खेळताना दिसला. कॅनडामध्ये टोरंटो नॅशनल संघाचं प्रतिनिधित्त्वं केलं होतं. तर, अबु धाबी टी10 लीगमध्ये मराठा अरेबियन्स या संघाचाही तो भाग होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून काढता पाय घेतलेला असतानाही तो स्थानिक क्रिकेटमध्ये परतण्याची आशा बाळगून होता. पण, बीसीसीआयनं त्याची ही मागणी नाकारली आहे.

(BCCI) बीसीसीआयनं आपल्या नियमावलीमध्ये कोणतेही बदल न करता युवराजची मागणी नाकारल्याचं कळत आहे. या नियमांअंतर्गत देशाबाहेरील कोणत्याही क्रिकेट लीगमध्ये खेळणाऱ्या खेळाडूला भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येत नाही. आयपीएलही याला अपवाद नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, युवराजनं बीसीसीआयच्या अध्यक्षपदी असणाऱ्या सौरव गांगुली याला पत्र लिहित भारतीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाची विचारणा केली होती. पण, परदेशातील संघांचा भाग असल्यामुळं त्याच्यामुळं बीसीसीआयनं नियमांत कोणताही बदल न करता त्याची मागणी फेटाळल्यालं म्हटलं जात आहे.

दरम्यान, युवराजनं यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण, त्याचे वडील योगराज सिंग यांनी मात्र संघातील माजी खेळाडूंना परतण्याची संधी देण्य़ात यावी, ही मागणी उचलून धरली. असा प्रसंग पहिल्यांदाच ओढवलेला नाही. यापूर्वी म्हणजेच 2020 मधीला आयपीएलमध्ये प्रविण तांबे या खेळाडूची 2019 मधील लिलावात बोली लागूनही त्याला सहभागी होता आलं नव्हतं. बीसीसीआयच्या कोणत्याही सहमतीशिवाय तो अबुधाबी टी10 स्पर्धेत सहभागी झाला होता. त्यामुळंच त्याला इथं परवानगी नाकारण्यात आली.

युवीच्या करिअरवर दृष्टीक्षेप

युवराजच्या क्रिकेट कारकिर्गीबाबत सांगावं तर, त्यानं 40 कसोटी सामन्यांत भारतीय संघाचं प्रतिनिधित्त्वं केलं होतं. तर, 304 एकदिवसी आणि 58 टी20 सामन्यांचा तो भगा होता. कसोटी सामन्यांमध्ये त्यानं 1900 धावा, एकदिवसीय सामन्यात 8701 धावा आणि टी20 सामन्यांत 1177 धावांचं योगदान संघासाठी दिलं होतं. 2007 चा टी20 विश्वचषक त्यानं गाजवला होता. इंग्लंडविरोधातील सामन्यांत एका षटकातील प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकत अर्थात 6 चेंडूंवर 6 षटकार मारत त्यानं विरोधी संघाचे तीनतेरा वाजवले होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.