मी सुद्धा भरपूर खाज असलेला खासदार आहे; उदयनराजेंची फटकेबाजी

0 झुंजार झेप न्युज

 भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले.

सातारा: भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते आज ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन झाले. यावेळी उदयनराजे यांनी जोरदार फटके बाजी केली. ग्रेड सेपरेटरच्या उद्घाटनासाठी मंत्रीच कशाला हवेत. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही, तर भरपूर खाज असलेला खासदार आहे, अशी जोरदार फटकेबाजी उदयनराजे यांनी केली. 

साताऱ्यातील पोवई नाका येथे ग्रेड सेपरेटर उभारण्यात आले आहे. त्याचे आज उदयनराजे भोसले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. पालकमंत्र्यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले नाही, त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. यावरून टीका होत असतानाच उदयनराजे यांनी त्यावरून जोरदार फटकेबाजी केली. मंत्र्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं असा काही कायदा आहे का? ते मंत्री असले तरी आधी आमदार आणि खासदार आहेत ना. मी सुद्धा खासदार आहे. आणि असा तसा खासदार नाही. भरपूर खाज असलेला खासदार आहे, असं त्यांनी सांगितलं.

पोरं व्हायलाही नऊ महिने लागतात

ग्रेड सेपरेटरच्या कामलाा उशिर झाल्याबद्दलही त्यांना विचारण्यात आलं. त्यावरही त्यांनी त्यांच्या खास अंदाजात फटकेबाजी केली. काम करताना… एक लक्षात घ्या… थोडा त्रास होणार. पोरंही एका दिवसात होत नाहीत. नऊ महिने लागतात… त्रास तर होतोच… त्रास झाल्याशिवाय मुलंही होत नाहीत… हे तर ग्रेड सेपरेटर आहे, थोडा त्रास तर होणारच, असा चिमटाही त्यांनी काढला.

अभी के अभीच

यापूर्वी 8 जानेवारी रोजी उदयनराजे ग्रेड सेपरेटरच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी फित कापून रस्ता खुला केल्याचं जाहीर केलं होतं. त्यानंतर त्यांच्या खास स्टाईलमध्ये कॉलर उडवत त्यांनी मीडियाशी संवाद साधला होता. आजपासून… होय, आजपासून हा रस्ता जनतेसाठी खुला झाला आहे. ते काय म्हणतात…. अभी के अभीच!, असं म्हणंत त्यांनी कॉलर उडवली होती. तेव्हा एकच हशा पिकला होता.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.