नागपुरात अज्ञातांनी पार्किंगमधल्या कार पेटवल्या, लाखोंचं नुकसान

0 झुंजार झेप न्युज

 नागपुरात पुन्हा एकदा वाहन पेटवल्याची घटना पुढे आली आहे. येथील उंटखाना परिसरात काही अज्ञातांनी पाच ते सहा चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत.

नागपूर : नागपुरात पुन्हा एकदा वाहन पेटवल्याची घटना पुढे आली आहे. येथील उंटखाना (Nagpur Car Burned) परिसरात काही अज्ञातांनी पाच ते सहा चारचाकी गाड्या पेटवल्या आहेत. यामुळे वाहनमालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे. सध्या पोलीस या प्रकरणातील अज्ञात आरोपींचा शोध घेत आहेत.

नेमकं काय घडलं?

नागपुरातील उंटखाना परिसरात असलेल्या नागरी वस्तीत काही अज्ञात समाजकंटकांनी घराबाहेर पार्क केलेल्या पाच ते सहा चारचाकी वाहनं जाळल्या. शनिवारच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

उंटखाना परिसरातील दहिपुरा लेआऊटमध्ये उभी असलेली चार चाकी वाहनं काही समाजकंटकांनी पेटवल्या. दहा ते बारा गाड्या दहिपुरा भागात उभ्या होत्या. या पैकी तीन कार पुर्णपणे जळाल्याने वाहन मालकांचं लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

कार जळाल्याचे लक्षात आल्यावर तेथील नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सर्व वाहनांचं नुकसान होण्यापासून टळलं आहे. त्यामुळे काही कार वाचविण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला आहे (Nagpur Car Burned).

अशा घटनेत कार मधील पेट्रोल टँकचा स्फोट होण्याचा धोका असतो. मात्र, नागरीकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने कुठलीही अप्रिय घटना घडली नाही. या प्रकरणी इमामवाडा पोलीस चौकशी करीत आहेत. नजीकच्या चौकातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरु आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.