बोगस एफडीआर प्रकरणातील त्या १८ ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा..

0 झुंजार झेप न्युज

 बोगस एफडीआर प्रकरणातील त्या १८ ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा..

पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- महापालिकेची विकासकामे घेताना ठेकेदारांनी बोगस एफडीआर आणि बँक हमी दिल्याचे आढळून आले आहे. त्या १८ ठेकेदराना तीन वर्षासाठी काळ्या यादीत टाकण्यात आले आहे. त्यांची नावे महापालिकेने जाहीर केली आहेत. त्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश स्थायी समिती सभेत देण्यात आले आहेत. मात्र, ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी चालढकल केली जात आहे.

याबाबत अपक्ष आघाडीचे गटनेते कैलास बारणे यांनी पुण्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेतली. महापालिकेची फसवणूक करणा-या १८ ठेकेदारांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी बारणे यांनी निवेदनाद्वारे गृहमंत्रांकडे केली आहे.

निवेदनात त्यांनी म्हटले की, याप्रकरणी पोलिसांकडे तक्रार कोणी द्यायची यावरून शहर अभियंता, सर्व प्रभागाचे कार्यकारी अभियंता, बीआरटीएस, ईडब्ल्यूएस प्रकल्प अधिका-यामध्ये मतभेद निर्माण झाले आहेत. प्रत्येक जण एकमेकांकडे बोट दाखवून तक्रार देण्यास नकार देत आहेत. त्यामुळे ठेकेदारांना पाठबळ मिळत आहे. याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनीही दुर्लक्ष केले आहे. याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी विनंती नगरसेवक बारणे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.