मोहननगरमध्ये मध्यरात्री मद्यपींकडून ऱ्हाडा; वाहनांची तोडफोड..
पिंपरी (दि. ०१ जानेवारी २०२१) :- मोहननगरमध्ये नववर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी काही तरुण एकत्र आले होते. त्यांनी मद्यपान केलं. परंतु, किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाले.
यातूनच रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या सहा चारचाकी आणि रिक्षांचा काचा कोयत्याने फोडून हुल्लडबाजी केली. ही घटना रात्री साडेबाराच्या सुमारास मोहननगर चिंचवड येथे घडली.या प्रकरणी अल्पवयीन मुलासह १३ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

