राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”
मुंबई : भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागावर (Maharashtra PWD) गंभीर आरोप केले आहेत. “राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली”, असा थेट आरोप अतुल भातखळकरांनी केला. भातखळकरांनी पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर (Thackeray Sarkar) हल्लाबोल केला.
अतुल भातखळकर म्हणाले, “राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात घोटाळा झाला आहे. खोटी बिलं दाखवण्यात आली. राज्य सरकारने बांधकाम विभागात घोटाळा केला. 70 ते 80 कोटी रुपयांची खोटी बिलं कंत्राटदारांना देण्यात आली. 2010 ते 30 नोव्हेंबर 2020 पर्यंतची ही बिलं आहेत. दोन ते तीन महिन्यात सर्व नियम धाब्यावर बसवत, सगळी बिलं पास केली. या बिलांचं पेमेंट खोटं आहे. ही बिलं पास झाली नव्हती, आता पास कशी झाली? याची चौकशी करायला हवी. ज्या अधिकाऱ्यांनी हा घोटाळा केला, त्यांच्यावर कारवाई करा. अन्यथा 15 दिवसांत कोर्टात जाणार”
एकट्या मुंबईतून 70 केटींची बिलं पास झाली. या घोटाळ्याचे तार नांदेडपर्यंत आहेत, असं म्हणत भातखळकरांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.
कोरोना काळात पैस नव्हते तर मग बिलं पास कशी केली? ही बिल मंत्र्यांच्या बंगल्यांची, मंत्रालयातील कामांची, सरकारी कामांची बिलं. मुळात ही बिलं खोटी आहेत. ३५ टक्के कमिशनने ही बिलं ठाकरे सरकारने पास केली असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.
सामनावर हल्लाबोल
जे जगाला चारित्र्य शिकवतात त्यांच्याकडून ज्या भाषेचा वापर होतोय, हे चुकीचे आहे. सामनाच्या संपादक या मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत. त्यामुळे ही भाषा शोभणारी नाही. हायकोर्टाने चपराक लगावलीये तरी यांना कळत नाही, असं भातखळकर म्हणाले.
मेहबुब शेखप्रकरणावरुन राष्ट्रवादीवर निशाणा
राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर गुन्हा दाखल आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस तोंड उघडत नाही. महिलांच्या अत्याचारावर खासदार सुप्रिया सुळे इतर नेते मोर्चे काढतात, आणि इथे मात्र तोंड बंद होतं. हा निर्लज्जपणाचा कळस आहे.

