पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची धडाकेबाज कामगिरी..
पिंपरी (दि. ०२ जानेवारी २०२१) :- पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी शहरातील ४८७ पोलीस अंमलदारांना पदोन्नती देत नववर्षाची भेट दिली. सेवा ज्येष्ठतेनुसार अंमलदारांचे पोलीस शिपाई, हवालदार आणि सहाय्यक फौजदार होणार आहेत.
पोलीस अंमलदार समाजाच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावतात. त्यांच्या कामाचे कौतुक केल्यास त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने काम करता येईल. म्हणून पिंपरी चिंचवड आयुक्तालयातील अंमलदारांना बढती देण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.
त्यानुसार २७२ अंमलदार पोलीस शिपाई ते पोलीस नाईक या पदावर जातील. तर, दीडशे अंमलदार पोलीस नाईक ते पोलीस हवालदार आणि ६५ जण पोलीस हवालदार ते सहाय्यक पोलीस फौजदार होतील.

