सिडनी टेस्टमध्ये रोहित शर्माचं पुनरागमन नक्की, शार्दुल आणि सैनीपैकी कुणाला मिळणार संधी?

0 झुंजार झेप न्युज

 बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना सिडनीत (Sydney) खेळण्यात येणार आहे.

सिडनी: बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील (Border Gavskar Trophy) तिसरा कसोटी सामना सिडनीत (Sydney) खेळण्यात येणार आहे. ही तिसरी कसोटी 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. या कसोटीसाठी टीम इंडिया सिडनीमध्ये पोहचली आहे. तिसऱ्या कसोटीत सलामीचा फलंदाज म्हणून मयांक अग्रवालच्या (mayank Agrawal) जागी रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार असल्याचं आता जवळपास निश्चित आहे. तर दुखापतग्रस्त उमेश यादवच्या (Umesh Yadav) जागी शार्दुल ठाकूर (Shardul Thackur) किंवा नवदीप सैनी (navdeep Saini) यापैकी एकाची निवड होणार आहे. 

मयांक अग्रवालला पाठीमागच्या आठ कसोटी डावांपैकी सात डावांमध्ये समाधानकारक कामगिरी करण्यात अपयश आलं आहे. त्यामुळे त्याच्याऐवजी रोहित शर्माला टीम इंडियात सामिल करण्यात संघ व्यवस्थापनाला कुठलीही अडचण येणार नाही.

पाठीमागच्या काही दिवसांपूर्वी मुंबईचा जलदगती गोलंदाज शार्दुल ठाकूरच्या टीम इंडियातल्या समावेशावरती अनेक दिग्गजांचं चांगलं मत होतं. परंतु आता नवदीप सैनीने ऑस्ट्रेलियन फलंदाजांना आपल्या बोलिंगने हैरान केलं आहे. त्याच्या स्पीडने ऑस्ट्रेलियन बॅट्समनची दांडी गुल झाली आहे. तसंच बॅटिंग करण्यात देखील शार्दुल माहिर मानला जातो.

तिसरा बोलर कोण यासाठी आजचा दिवस जाऊ द्यावा लागणार आहे. कारण मंगळवारी संपूर्ण पीचवर आवरण होतं. बुधवारी पूर्ण पीच आणि बाकीची परिस्थिती पाहून टीममध्ये कुणाकुणाला स्थान मिळेल, हे स्पष्ट होईल. जर ढगाळ वातावरण राहिलं आणि पीचमध्ये थोडासा ओलसरपणा राहिला तर संघात शार्दुल ठाकूरची वर्णी लागू शकते. जर पीच सपाट राहिलं तर नवदीप सैनीला संघात स्थान मिळू शकते.

केवळ 25 टक्के प्रेक्षकांनाच संधी

खबरदारी म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मोठा निर्णय घेतला आहे. सिडनी स्टेडियमच्या एकूण क्षमतेच्या 25 टक्के प्रेक्षकांनाच हा सामना स्टेडियममध्ये येऊन पाहता येणार आहे. दोन्ही संघाच्या खेळाडू ,सदस्य आणि प्रेक्षकांना कोणतीही बाधा होऊ नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं क्रिकेट ऑस्ट्रेलियाने स्पष्ट केलं आहे.

सिडनीवरील हेड टु हेड कामगिरी

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडियामध्ये सिडनीत एकूण 12 कसोटी सामने खेळले गेले आहेत. टीम इंडियाला 12 पैकी 1 सामना जिंकता आला आहे. तर ऑस्ट्रेलियाने 5 सामने जिंकले आहेत. तर 6 सामने अनिर्णित राहिले आहेत. तसेच टीम इंडियाने हा एकमेव सामना 42 वर्षांपूर्वी जिंकला होता. हा सामना 12 जानेवारी 1978 रोजी खेळला गेला होता. तेव्हापासून ते आतापर्यंत टीम इंडियाला सिडनीवर विजय मिळवता आलेला नाही. त्यामुळे अजिंक्य रहाणेला या मैदानावर इतिहास घडवण्याची संधी आहे.

Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.