अमर ज्योत सेवा संघ संस्था यांच्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला दिले निवेदन
प्रति,
मा.श्री.आयुक्त साहेब
पिं.चिं. मनपा
पिंपरी पुणे...18
राहणार:-सुभाष नगर पिंपरी कॅम्प सी.टी.एस नं.3020 पिंपरी पुणे.17
विषय:-उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार झोपडपट्टीधारकांना माल की हक्क देण्याकरिता चालढकल न करता तात्काळ बैठक व झोपडपट्टी नागरिकांनाच्या हीतात निर्णय घेण्याबाबत.
महोदय,
आपणास कळविण्यात येते की उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी चे उतारे देण्याकरिता दि.05/12/2016 रोजी मालकी हक्क समिती गठ्ठीत केली समितीची कार्यक्षम नियम क्र.3नुसार दर तीन महिन्याने बैठक घेण्याचे ठरले आहे.
सन 2016 पासून आज त्याग नियमानुसार सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याची समितीचे वीस बैठक होण्याचे अपेक्षित असताना. वारं वार लेखी व तोंडी पाठपुरावा करून पिंपरी चिंचवड महानगरपालिका कडून आज पर्यंत फक्त तीनच बैठक घेण्यात आली असून त्यात ही सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालिका हक्क देण्यात संबंधी काही ठोस कार्य प्रणाली व आदेश घेण्यात आले नाही आहे मालकीहक्क देण्या संबंधी पिं.चिं. मनपा
उदा शीत दिसत आहे.
तरी मी समिती सदस्य असून आपणास कळकळीची विनंती करतो की समितीची पुढील बैठक तात्काळ घेत सरकारी जागेवरील झोपडपट्टीधारकांना मालकी हक्क देण्याचा निर्णय घेण्यात यावी ही नम्र विनंती.

