पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे विजय

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी विधानसभा मतदारसंघात आमदार अण्णा बनसोडे विजय 

पिंपरी चिंचवड,दि.24: पिंपरी विधानसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आमदार अण्णा बनसोडे विजयी झाले. पिंपरी विधानसभेत राष्ट्रवादी (अजित पवार) विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार गट) अशी दुरंगी निवडणूक झाली. यामध्ये शरद पवार गटाच्या उमेदवार सुलक्षणा शीलवंत धर यांना सुमारे ३६,६६४ मतांनी पराभूत करत अण्णा बनसोडे यांनी विजयश्री खेचून आणला आहे. बनसोडे यांना विजयी प्रमाणपत्र निनडणुक अधिकारी अर्चना यादव यांनी प्रदान केले.

पिंपरी मतदारसंघात पहिला फेरीपासूनच अण्णा बनसोडे यांनी आघाडी घेतली होती. पोस्टल मतदानात देखील बनसोडे पुढेच होते. शेवटच्या २० व्या फेरी अखेरीस ३६ हजार ६६४ मतांची आघाडी घेत बनसोडे यांनी या निवडणुकीत बाजी मारली.

उमेदवारांना मिळालेली अंतिम मतं

अण्णा बनसोडे – १,०९,२३९ (३६,६६४ आघाडी)

सुलक्षणा शिलवंत – ७२,५७५

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.