पुणे नाशिक महामार्गावर भीषण अपघात, वाहकाचा जागीच मृत्यू

0 झुंजार झेप न्युज

पिंपरी-चिंचवडमधून जाणाऱ्या नाशिक- पुणे या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा आज (बुधवार) पहाटे भीषण अपघात झाला. या घटनेत एसटी बस वाहकाचा जागीच मृत्यू झाला असून तीन प्रवासी जखमी झाले आहेत. पहाटे धुक्यांमुळे रस्त्याच्या कडेला उभा असलेला ट्रक न दिसल्याने, भरधाव वेगातील बस थेट ट्रकला पाठीमागून धडकल्याने हा भीषण अपघात घडला. याप्रकरणी बस चालकाला भोसरी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
अंबादास दिनकर खेडकर (वय-३२) असे मृत्यू झालेल्या बस वाहकाचे नाव आहे. तर गंगाराम दिनकर सानप
असे बस चालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धुळे बस आगारातील बस (एम.एच-२० बी.एल-३४२६)
साक्रीहुन पुण्याच्या दिशेने निघाली होती.
दरम्यान पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास नाशिक-पुणे महामार्गावर भोसरी पोलीस ठाण्यासमोर रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या ट्रकला पाठीमागून भरधाव वेगात असलेली ही बस धडकली. या भीषण अपघातात बस वाहक अंबादास यांचा जागीच मृत्यू झाला तर तीन प्रवासी जखमी झाले आहेत. या घटनेप्रकरणी बस चालकाला दोषी धरून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी पोलीस करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.