पुणे : पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे जेष्ठ सल्लागार कॉम्रेड मोहन गर्दे (वय 72) यांचे मंगळवारी तीव्र ह्रदय विकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी व एक मुलगी जावई व नातवंडे असा परिवार आहे.
महानगरपालिकेत अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचे स्वि सहाय्यक व स्टेनो ग्राफर म्हणून महानगरपालिकेत ३७ वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झाले. गेल्या १० वर्षापासून पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सल्लागार म्हणून काम पाहिले.
पुणे महानगरपालिकेतील कर्मचारी व अधिकारी काही कारणांमुळे निलंबित झाले असतील तर, कायदेशीर बाजू मांडणारे मोहन गर्दे हे युनियनच्या व पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनातील एक अभ्यासूवृतीचे महत्वाचे दुवा होते.
तसेच युनियनच्या कामगारांच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातील न्यायालयीन लढ्याचे कामकाज पहात होते.
तसेच युनियनच्या कामगारांच्या अनेक प्रश्नांच्या संदर्भातील न्यायालयीन लढ्याचे कामकाज पहात होते.

