मिरज- सांगोला महामार्गावर जुनोनीजवळ दोन पिकअप जीप व दुचाकीच्या झालेल्या तिहेेरी अपघातात तीनजण ठार तर दोनजण जखमी झाले. ही घटना बुधवारी (दि. 20) दुपारी घडली.
अजित रंगराव तुरूके (वय 35) सागर रघुनाथ पडुळकर (वय 38, दोघेही रा. कुकटोळी,ता. कवठेमहांकाळ) तर अक्षय आनंदा जाधव (वय 23, रा. तारदाळ, ता. इचलकरंजी) असे अपघातात ठार झालेल्यांचीनावे आहेत. ज्योतिबा अण्णासो मोठे (वय 29, रा. रांगोळी (ता. हातकणंगले) व सुदाम बंडू पन्हाळकर रा. नालवंडी (ता. पाटोदा जि. बीड ) दोघे जखमी झाले.
तुरुके व पडुळकर हे सांगोला तालुक्यातील बुरुंगवाडी येथील लग्नकार्य आटोपून कुकटोळी येथे माघारी निघाले होते.
सांगोला तालुक्यातील जुनोनीजवळ मिरजेकडून (एम. एच. 23, 5019) पिकअपची व मिरजकडे जाणार्या (एम. एच. 10, बी. ओ. 7376) या दोन वाहनांची समोरासमोर धडक झाली.
यामध्ये तुरुळे व पडळकरहे ठार झाले. त्यानंतर मिरजकडे जाणार्या दुचाकी (एम. एच. 09 -8660) व अपघातातील पिकअप यांच्या धडकेत पिकअप मधील अक्षय जाधव हा ठार झाला. पिकअपमधील ज्योतिबा मोठे, सुदाम पन्हाळकर हे जखमी झाले.अपघाताचे वृत्त समजताच पोलिस निरीक्षक राजेश गवळी यांनी घटनास्थळी भेट दिली.