‘धर्म निरपेक्षता आम्ह्नाला शिकवू नये,” असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेसला चिंता काढला आहे. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही महाशिव आघाडीला हिरवा कंदील दिला आहे. मात्र भिन्न विचारसरणीच्या पक्षांनी एकत्र येण्यासाठी सोनिया गांधी यांनी पक्षाच्या नेत्यांना काही अटी घातल्या आहेत.
तिनही पक्ष एकत्र तर असताना काँग्रेसालाही आपल्या प्रतिमेची काळजी आहे. तसेच हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेणे काँग्रेसला ठोस आश्वासन दिला तरच काँग्रेस पुढे जाणार आहे. त्यावर राऊत यांनी धर्मनिरपेक्षतेबद्दल आपले स्पष्टीकरण दिले आहे. ” आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे.
त्याचप्रमाणे "आपला देश आणि देशाची घटना सेक्युलर या संकल्पनेवर आधारित आहे. कोणालाही मदत करताना जात धर्म पंथ पाहून मदत केली जात नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनीदेखील सर्व धर्मियांना एकत्र घेऊन राज्य स्थापन केलं होतं. आम्ही देशाच्या घटनेचा आदर करतो. शिवसेना प्रमुख बाळासाहेबर हे देशातील एकमेव असे नेते आहेत ज्यांनी न्यायालयात कुराण, भगवतगीतेवर हात ठेवून शपथ घेण्याऐवजी संविधानावर हात ठेवून शपथ घेण्यास सांगितलं होतं," असंही राऊत म्हणाले. तसंच यामुळे सेक्युलर या शब्दावर अधिक बोलण्याची गरज नसल्याचं ते म्हणाले.

