ठाणे महापौरपदी नरेश म्हस्के, उपमहापौरपदी पल्लवी कदम यांची बिनविरोध निवड

0 झुंजार झेप न्युज

ठाणे - महापौर आणि उपमहापौरपदासाठी बिनविरोध म्हणून नरेश म्हस्के आणि पल्लवी कदम यांची सेनेकडून निवड झाली असून, आज दुपारी 1 नंतर पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना नेते आदित्य ठाकरे ठाणे महापालिकेत येणार आहेत. तसेच इतर सेना नेते देखील उपस्थित असणार आहेत. राज्यात बदललेलं सत्ता समीकरण पाहता ठाण्यात महाआघाडीचा महापौर होईल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. यामुळे ठाणे मनपामध्ये शिवसेनेविरुद्ध कोणत्याच पक्षाने महापौर व उपमहापौरपदाकरता अर्ज भरला नाही. तर दुसरीकडे महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच चालू आहे, त्यामुळे खालच्या पातळीवर हायकमांड काय ठरवतील, असे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अनेक वर्षापासून ठाण्यात सेनेची एक हाती सत्ता आहे.
तसेच आज ठाण्यात महापौर आणि उपमहापौरपदाची माळ गळ्यात पडली आहे, यासाठी ठाणे महापालिकेच्या आवारात मोठ्या प्रमाणात सजावट करत पोस्टरबाजी देखील करण्यात आली आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

आमच्या विषयी

झुंजार झेप न्यूज हे सत्य आणि निष्पक्ष पत्रकारितेसाठी झुंजारपणे उभं राहिलेलं एक व्यासपीठ आहे. आमचा उद्देश समाजातील घडामोडी प्रामाणिकपणे लोकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. ग्रामीण ते शहरी, प्रत्येकाच्या आवाजाला आम्ही मंच देतो. राजकारण, समाज, शिक्षण, शेती, रोजगार यांसह सर्व महत्त्वाच्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करतो. आपला विश्वास आणि पाठिंबा हेच आमच्या झुंजार झेपेचं खरं बळ आहे.